उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे नव्हे तर ‘हा’ शिवसैनिक बनणार मुख्यमंत्री ? पवारांची देखील पसंती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झाले आहे. मात्र असे झाल्यास शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष होते. सुरुवातील आदित्य ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे यांचे देखील नाव या पदाच्या शर्यतीत पुढे होते. मात्र काल उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊत यांच्या नावाची देखील चर्चा सुरु झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी देखील संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पसंती दर्शवली असल्याचे समजते. संजय राऊत हे सध्या शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्यांनी गेल्या वीस दिवसांमध्ये आपली भूमिका अग्रेसर पद्धतीने मांडली आहे.

शिवसेनेतून याही नावांची चर्चा
सुरुवातील शिवसेनेतून आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदासाठी वारंवार शिवसैनिकांकडून नाव घेतले जात होते. तसेच स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या देखील नावाची चर्चा होत. त्यासोबतच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे देखील नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे आता नेमकं मुख्यमंत्री पदाची माळ कोणत्या शिवसैनिकाच्या गळयात पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालाय. त्यामुळे सर्वात जास्त संख्याबळ असूनही भाजप विरोधी बाकावर बसणार हे सुद्धा निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता आघाडीसोबत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यात यश आले तर तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात पुन्हा होणार आहे.

Visit : Policenama.com