‘मुख्यमंत्रिपदा’साठी शरद पवारांची ‘उद्धव ठाकरें’च्या नावाला पसंती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. चर्चा सुरु आहे ती मुख्यमंत्रिपदी कोणाला बसवणार. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांची आज मुंबईत संयुक्त बैठक सुरु आहे. या दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना पसंती दर्शवल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना प्राधान्य दिसल्याचे कळते.

एकीकडे मुंबईत राजभवनावर सत्तास्थापनेची लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकासआघडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक सुरु आहे. आजची ही संयुक्त बैठक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत सत्तावाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रिपदवर चर्चा होणार आहे.

या दरम्यान मुख्यमंत्री गटनेत्यांचे नेतृत्व करत असतो त्यामुळे मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावे अशी चर्चा आहे. आता शरद पवार देखील मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर आग्रही आहेत.

परंतू शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्विकारण्यास तयार नाही अशी चर्चा होती परंतू आता जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला तर पवारांची संजय राऊतांना पसंती मिळू शकते.

या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. मागील 1 तासापासून सत्तास्थापनेवरुन या बैठकीत खलबतं सुरु आहेत. आता निर्णय काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com