Homeताज्या बातम्याSharad Pawar | '4 वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस' ! शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar | ‘4 वर्गमित्र, विचारवंत आणि बॉस’ ! शरद पवार म्हणाले – ‘माझ्यापेक्षा पूनावालांचे कर्तृत्व मोठे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. जगात जन्मलेल्या पाच मुलांपैकी तिघांना सिरमची लस (vaccine) दिली जाते. एवढे मोठे काम करणारी दुसरी संस्था अथवा व्यक्ती देशात असेल मला वाटत नाही. व्यक्तीच्या कर्तृत्वाचे आपण मोजमाप करत नाही याचे उदाहरण म्हणजे सायरस पूनावाला. सरकारने त्यांना पद्मश्री दिला आणि मला पद्मविभूषण, पण माझ्यापेक्षा त्याचे कर्तृत्व निश्चितच मोठे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते.

 

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 25 नोव्हेंबरला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात येते. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते सिरम इन्स्टिट्यूटला राज्य पातळीवरील पुरस्कार देण्यात आला. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शाळीग्राम (Dr. Umesh Shaligram) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर (Senior Scientist Anil Kakodkar), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), अरुण गुजराथी (Arun Gujarathi), हेमंत टकले (Hemant Takle), शरद काळे (Sharad Kale) उपस्थित होते.

 

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, सिरमचा जन्म झाला तेव्हापासून या संस्थेसोबत माझे संबंध आहेत. सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांच्या वडिलांचे पुण्यात फर्निचरचे दुकान होते. पूनावालांचे शिक्षण पण बी.कॉम पर्यंत झाले. ज्याचा संशोधनाशी काहीही संबंध नव्हता. परंतु एखादे काम हाती घेतल्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा स्वभाव होता. सायरस पूनावाला यांना घोड्याचा नाद होता. चांगले घोडे सांभाळणे, वेळप्रसंगी त्यांची रेसदेखील ते लावायचे. त्यानंतर घोड्याच्या शेपटीच्या रक्तापासून त्यांनी व्हॅक्सिन बनवली आणि तिथून त्यांची सुरुवात झाली, असे पवार यांनी सांगितले.

 

आमच्यातल्या विचारवंतांचे आम्ही बॉस झालो

यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला,
इथे दोन लोक बसले आहेत एक अग्रवाल आणि दुसरे अरुण गुजराथी.
आम्ही सगळे एका वर्गात होतो. आमच्या वर्गात हुशार विद्यार्थी हे दोघेच होते.
अग्रवाल अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) पदापर्यंत पोहोचले,
तर गुजराथी चार्टर्ड अकाऊंट (Chartered account) झाले. मी आणि सायरस मात्र कसेबसे पास झालो.
पण परिस्थिती अशी झाली की, आमच्यातल्या विचारवंतांचे आम्ही दोघे बॉस झालो.
हा गमतीचा भाग आहे, हा किस्सा सांगताच सभागृहात हशा पिकला.

 

Web Title :- Sharad Pawar | four classmates thinkers and boss poonawalas deed are greater mine says sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News