Sharad Pawar | ‘…तर मी शरद पवार यांच्या दौऱ्यात गाडीसमोर झोपणार’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | ‘सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) साखर कारखानदार शेतकऱ्यांची एफआरपी (FRP) देण्यास टाळाटाळ करत आहेत. 3 टप्प्यात एफआरपी देण्यास आपला विरोध असून एफआरपीची रक्कम ही एकाच टप्प्यात कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीसमोर झोपण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची एफआरपीची (FRP) थकीत रक्कम देण्यात येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या विषयावरुन जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी आज (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या साखर कारखानदारांना त्यांचे कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेले कारखाने बाहेर काढण्यासाठी शरद पवारांकडून 50 ते 100 कोटी रुपये दिले जातात. पण, शेतकऱ्यांच्या एफआरपीबाबत शरद पवार (Sharad Pawar) हे बैठक का लावत नाहीत?’ असा सवाल प्रभाकर देशमुखांनी उपस्थित केला आहे.
प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) म्हणाले की, आता एफआरपीचे आंदोलन आणखी तीव्र
करण्यात येणार असून येत्या 8 तारखेला शरद पवार (Sharad Pawar) हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या गाडीच्या ताफ्यासमोर आपण झोपून आपली मागणी मान्य करून घेऊ,
येत्या 2 दिवसात शरद पवारांनी याबाबत तातडीने बैठक लावून प्रश्न मार्गी लावावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात,’ अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Web Title : Sharad Pawar | FRP prabhakar deshmukh warns of agitation during ncp president sharad pawars visit in solapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update