शरद पवार चिडल्याचं सुप्रिया सुळेंनाही वाटलं ‘आश्‍चर्य’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार चिडल्याने त्याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. लोकांना देखील याचे आश्चर्य वाटत आहे की शरद पवारांना एवढा राग का आला ? खुद्द शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले. गेल्या पन्नास वर्षात मी त्यांना कधीही एवढं चिडलेलं पाहिलं नाही असे त्या म्हणाल्या.

शरद पवार यांच्या वागण्याचे आपल्यालाही आश्चर्य वाटल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या म्हणाल्या, कधीही न चिडणारा माणूस काल पहिल्यांना चिडला. मला याचे आश्चर्य वाटलं. गेल्या 50 – 52 वर्षात मी त्यांना कधीही चिडलेले पाहिलेले नाही. परंतू वडीलांच्या वयाच्या व्यक्तीला एक प्रश्च पाच वेळा विचारला की चीडचीड होऊ शकते, शेवटी ते ही माणूस आहेत. खरंतर आपल्या पिढीने याबाबत आत्मचिंतन करायला हवे.

शरद पवार यांना श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत नातेवाइकांशी संबंधित एक प्रश्न विचारला होता की, पक्षातील नेत्याबरोबरच तुमचे नातेवाईक देखील तुम्हाला सोडून चालले आहेत. त्यावर शरद पवार भडकले होते. ते पत्रकार परिषदेतून उठले, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –