‘या’ गोष्टींचा शरद पवारांना प्रचंड राग !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याबरोबरच देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. राजकारणासोबतच साहित्य, चळवळ, अर्थकारण, समाजकारण, कृषी अश्या विविध क्षेत्रांची शरद पवारांना पुरेपूर माहिती आहे, तसेच आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यातही पवार पुढे आहेत. मात्र या आधुनिकतेसोबत असलेली एक गोष्ट शरद पवारांना चांगलीच खटकते.

शरद पवार यांच्या फॉलोवर्समध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. त्यात आपल्या आवडत्या नेत्यांसोबत फोटो काढण्याची हौस सर्वाना असते. मात्र, मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याने काढलेला सेल्फी हा प्रकार शरद पवारांना आवडत नाही. किंबहुना शरद पवार यांच्यासोबत काढलेले सेल्फी फारसे पाहायला मिळत नाही. त्यात पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी शरद पवार व्यासपीठाकडे जात असताना एक तरुण शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना पवारांनी त्या तरुणाला खडसावले होते.

तसेच काही दिवसांपूर्वी मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी सामाजिक क्षेत्रातील मंडळी चर्चेसाठी गेली होती. चर्चा आटोपताच सर्वांनी पवारांसोबत फोटो काढायला सुरुवात केली. पवारही त्यांना प्रतिसाद देत होते. मात्र त्याचवेळी एका तरुणाने पवार यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता. यावर शरद पवार संतापले आणि सेल्फी न काढण्याच्या त्यांनी सूचना केल्या. यावरून पवार यांना सेल्फी हा प्रकार आवडत नसल्याचे समोर आले.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/