शरद पवारांनी भाजपचा ‘तो’ डाव उधळून लावला : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची भूमिका ठामपणे मांडणारे आणि महाष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. शरद पवारांनी भाजपने दिलेल्या ऑफर बाबत स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा जर घ्यायचाच होता. तर पाच वर्ष का थांबले असा सवाल त्यांनी केला आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते.
भाजपला जेव्हा शरद पवार स्वत:हून ऑफर देतात तेव्हा ती महत्त्वाची गोष्ट आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं राज्यात सरकार बनवण्यासाठी भाजप किती उतावळी होती हेच यातून दिसून येते. महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्य़ंत अगदी प्रधान मंत्र्यांपर्यंत यातून स्पष्ट झालेलं आहे. एकिकडे सांगतात स्पष्ट बहुमत नाही, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावली, मग तुम्ही अजित पवारांना फोडण्याचा प्रयत्न केलात. आणि तेही जमले नाही. त्यानंतर शरद पवारांवर अशाप्रकारे जाळं फेकत होतात, असे राऊत म्हणाले.

यामध्ये देखील ते यशस्वी झाले नाहीत. यातून एकच स्पष्ट होते की शिवसेनेच्या हाती सत्ता लागू देयची नाही. शरद पवार चालतील, इतर कोणीही चालेल मात्र शिवसेना नको असेच यातून स्पष्ट होते. मात्र, शरद पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला. पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा जर घ्यायचाच होता. तर पाच वर्षे का थांबले. या आधीसुद्ध शरद पवार विरोधात होते, अनुभव त्यांचा तोच आहे, व्यक्तीपण तीच आहे. आता केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापनेची गरज वाटते. त्यांना याचा फायदा घेयचा होता, हे जनतेला कळत नाही का ? असे म्हणत त्यांनी भाजपवर तोफ डागली.

Visit : policenama.com