पवारांची ‘ती’ भीती अनाठायी : प्रकाश आंबेडकर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रिया सुळे या पराभूत झाल्यातर ईव्हीएममधील फेरफरामुळेच होऊ शकतात, असे वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावरून त्यांना बारामतीच्या निकालाबद्दल त्यांच्या मनात धाकधूक असल्याची चर्चा होती. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची ही भीती अनाठायी असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे बारामती मधून विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शरद पवार यांनी बारामतीत बऱ्यापैका काम केले आहे. बारामतीत पराभवाची त्यांची भीती मला खरी वाटत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सुप्रिया सुळे या ठिकाणाहून पराभूत होणार नाहीत असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी निवडणुकीनंतर सुरू केलेल्या दुष्काळ दौऱ्यावर टीका केली. दुष्काळी भागाचा दौरा मी देखील केला, पण त्याचे मार्केटिंग केले नाही. मेलेल्या टाळूवरचे लोणी खायची मला सवय नसल्याचे सांगत ५० वर्षे ज्यांनी पाणी चोरले, ते आता दुष्काळावर बोलतात, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

Loading...
You might also like