नागपूरच्या ‘पैलवाना’शी भेट झाली का ? असं विचारल्यावर शरद पवार म्हणाले…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विदर्भ दौरा करून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील दिली. निवडणुकीनंतर तुमची नागपूरच्या पैलवानाशी भेट झाली होती का ? असा प्रश्न यावेळी पवारांना विचारला असता मिश्कीलपणे हसत ‘आता परत कशाला ते विचारता’ असे पवार म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात चांगलेच वाक्य युद्ध रंगले होते. समोर कोणी पैलवानच नाही असं फडणवीस विरोधकांना म्हणाले होते तर आम्ही अशा सोबत कुस्ती खेळत नसल्याचे पवारांनी सांगितले होते. पवार संध्या विदर्भ दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना पुन्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी पवारांनी राजकीय भाष्य केले.

काँग्रेस – राष्ट्रवादी नेहमी धर्म निरपेक्षतेची कास धरतात महाशिव आघाडी बाबत चर्चा सुरु आहे. चर्चा संपली की योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पवार आक्रमक
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे शरद पवारांनी यावेळी नमूद केले. तसेच याबाबत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करणार असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

नेमकं काय म्हणाले शरद पवार
18 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक बैठक बोलवावी असा प्रयत्न करू
सरसकट पंचनामे करण्यासाठी आमचा आग्रह
साठ ते सत्तर टक्के संत्री गळून पडली
संत्रा, मोसंबी, कपाशीवर पावसाचा परिणाम
संत्र्याचा एक बहर नष्ट झाला
काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा आहे
सरकारनं यात लक्ष घालावं
काही ठिकाणी इथल्यापेक्षा परिस्थिती गंभीर, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
तकऱ्यांना कर्जमाफी मिळेला का यासाठी प्रयत्न कऱणार

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like