शरद पवार @ FB Live : विधानसभेत नवीन पिढीला संधी देणं गरजेचं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पेजवरून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार यांनी उत्तरे दिली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर नवीन पिढीला संधी देणं गरजेचे असल्याचे सांगितले.

शरद पवार यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्याबबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना म्हणाले, जे सत्तेत आहेत त्यांच्यावर टीका न करता ते आमच्यावर टीका करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी घराणेशाहीच्या मुद्यावरून राष्ट्रावादी काँग्रेस पक्षावर सातत्याने टीका केली आहे. या टीकेला शरद पवार यांनी आज उत्तर दिले.

सध्या सोशल मीडियाचे महत्त्व वाढलेले आहे. प्रत्येक पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. राजकीय क्षेत्रातही सोशल मीडियाचं महत्त्व वाढल्याने नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांशी जोडले गेले आहेत. याच पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी आज फेसबुकवरून लोकांशी संवाद साधला.

या मुद्यांवर केले भाष्य

तुमचे योगदान जनतेपर्यंत पोहचले नाही का ? तुम्ही कामाचे मार्केटींग का करत नाही ? तुमच्यावर आरोप झाले तरी तुम्ही त्याचा खुलासा करत नाही असा प्रश्न एकाने विचारला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, माल माझ्या कामाचा उदोउदो करायला आवडत नाही. आता मला असं वाटतय की मी केलेले काम सांगायला पाहिजे. मोदींवर निषाणा साधताना पवार म्हणाले, मोदींनी काहीही केले नाही, मात्र त्यांनी सांगण्याचे काम केले. याचा राजकीय फायदा झाला असे वाटत नाही.

एका तरुणाने शरद पवार यांना रोज रोज तेच नको, भाकरी फिरवा अशी भावना व्यक्त केली. त्यावेळी शरद पवार म्हणाले, येत्या विधानसभेत जास्तीत जास्त जागांवर नवीन पिढीला संधी देणे गरजेचे आहे. तसे मी पक्षातील नेत्यांना बोललो आहे. ज्यावेळी नवीन यादी येईल त्यावेळी भकरी फिरलेली असेल.

आरोग्य विषयक वृत्त –

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी