Sharad Pawar | ‘कर्तुत्ववान कार्यकर्त्याला पाठबळ देणं माझ काम म्हणुन आज आलो’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) आकुबाई पाडुळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांच्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटातील विविध विकासकामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्यात विरोधी पक्ष भाजपाचा (BJP) खरपुस समाचार घेत सक्षणा सलगर, धनंजय मुंडे (Dhananjay Munde), राजेश टोपे (Rajesh Tope) व स्वतः शरद पवार (Sharad Pawar) यांनी फटकेबाजी केली.

 

यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मी पुन्हा येणार वर फटकेबाजी करत राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) सक्षमपणे काम करत असून कर्तुत्ववान कार्यकर्त्याला पाठबळ देणे माझे काम आहे म्हणुन मी पाडुळीत आल्याचे सांगितले. तसेच युक्रेनमध्ये (Ukraine) आडकलेल्या विद्यार्थाना (Student) परत आणण्यासाठी राजकारणापलीकडे मदत करण्याचे अश्वासन दिले.

 

यावेळी बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, की केवळ पवारसाहेबांमुळे आज निवडणुकीत (Election) पराभूत होऊन विधान परिषदेचा (Legislative Council) विरोधीपक्ष नेता (Opposition Leader) झालो व आता मंत्री झालो. व्हत्याच नव्हत करण्याची ताकद फक्त पवारसाहेबांमध्ये आहे.

आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे यांनी कोरोना (Corona) काळात शरद पवार
यांच्या कामाचा उल्लेख करत उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र आरोग्य केंद्राचे (Health Center)
उप ग्रामीण केंद्रात रुपांतर करण्याचा प्रस्ताव पाठवा तात्काळ मंजुरी देऊ,
असा शब्द देत आगामी काळात पक्षाला साथ देण्याचे अवाहन केले. तर कार्यक्रमाच्या आयोजक व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा,
पाडूळी मतदारसंघाच्या जि प सदस्या सक्षणा सलगर यांनी आपल्या शैलीत मार्गदर्शन करत
पुष्पा (Pushpa: The Rise) सिनेमाचा डायलॉग सांगितला व पाडुळी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले.

 

Web Title :- Sharad Pawar | ‘I came here today to support a capable worker’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Management | डायबिटीज रुग्णाने झोपण्यापूर्वी आवश्यक करावे ‘हे’ काम, कंट्रोल राहिल ‘ब्लड शुगर’

 

BJP Maharashtra | ’50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती मेट्रो प्रकल्प पुण्यात आणले?, कौतुक करण्याचा तरी मनाचा मोठेपणा दाखवा’

 

Gold Price | सोन्याची जोरदार वाटचाल, मे 2021 नंतर दिसून आली सर्वात मोठी साप्ताहिक तेजी