Sharad Pawar | आगामी निवडणूकांच्या संदर्भात शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | ऊस उत्पादकांना बिले देण्यासाठी जुनीच पद्धत योग्य असल्याचे सांगत महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार टिकवायचे असेल तर सर्वांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साथ द्यावी. आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढण्याचा विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Solapur NCP) आयोजित केलेल्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. गुरुवारी आयकर विभागाने (Income Tax Department) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर छापे मारले. त्यावरूनही पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवल्याच्या काही जणांनी चिठ्ठ्या मला पाठवल्या. पण आपल्याला पाहुण्यांची चिंता नसते. विधानसभा निवडणुकीआधी एका बँकेच्या प्रकरणात मला ईडीने (ED) नोटीस पाठवली होती. ईडीने मला नोटीस दिली आणि भाजपला महाराष्ट्रातील लोकांनी येडे ठरवले. आता त्यांनी अजित पवार यांच्याबद्दलही काही गोष्टी केल्या असतील. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक भाजपला (BJP) पुन्हा धडा शिकवतील.

हाच आमचा मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा उचलला हात!
सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा निवडणूकीनंतर सरकार स्थापनेवेळी निर्माण झालेल्या स्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, भाजपने 106 आमदारांच्या जोरावर सत्ता स्थपनेचा दावा केलं अन आमच्या 54 आमदारांची पळापळ सुरु झाली. काँग्रेस, सेनेसोबत बैठक घेतली. सर्वजण शांत बसले होते. सर्वांचंच डोक थंड होत. तेवढ्यात शेजारी बसलेले उद्धव ठाकरे यांचे हात उंचावून हाच आमचा मुख्यमंत्री असे म्हणताच महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. कामे कुठे होतात हे कार्यकर्त्यांना माहित आहे. हे सरकार आपल्याला टिकवायचं आहे असेही त्यांनी सांगितले.

बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावे
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ (Maharashtra Band) पुकारला आहे.
भाजपविरुद्धच्या या बंदमध्ये सर्वपक्षियांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी केले.

Web Title :- Sharad Pawar | if maha vikas aghadi government wants survive support cm uddhav thackeray says ncp sharad pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | राष्ट्रवादीच्या आरोपानंतर चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण, म्हणाले – ‘शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे…’

MPSC Exam | राज्य सेवा परीक्षेच्या जागा वाढवल्या, MPSC कडून नवं परिपत्रक जाहीर

Pune Crime | पुणे सीआयडीकडून फरारी अ‍ॅड. सागर सुर्यवंशीला अटक, शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिराजवळ वेषांतर करून कारवाई