Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राज्यातील काही जिल्ह्यात काही महिन्यामध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकांची (municipal elections) रणधुमाळी आहे. या पार्श्वभुमीवर प्रत्येकजण आपल्या पक्षाची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. राज्यात जरी तीन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) असलं तरी जिल्ह्यात परिस्थिती वेगळी दिसत आहे. काही दिवसांपुर्वी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर आता राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे. त्यावेळी ते नागपुरात बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, नागपूर महानगरपालिका निवडणूकीत एकत्र लढणार का?
हे आत्ताच सांगता येणार नाही पण आघाडी केलेले पक्ष एकत्र लढले तर फायदा होईल.
आगामी निवडणुकांमध्ये आघाडी केलेले पक्ष एकत्र आले तर योग्य आहे.
नाही तर एकटं लढू असा इशाराच शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेला दिला आहे.
या विधानावरुन आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढेल का अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, एसटीचा संप तुटेपर्यंत ताणू नये असं सांगत शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, काही प्रश्न सोडवावे लागेल. एसटी महामंडळांचं विलीगीकरण लगेच शक्य नाही असं शरद पवारांनी सांगितले आहे.
Web Title : Sharad Pawar | if mva not form we will fight elections our own ncp sharad pawar upcoming municipal elections
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | दुर्दैवी ! मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून 21 वर्षीय नवविवाहीतेचा मृत्यू