Chandrakant Patil : शरद पवार हे सगळयांचे गॉडफादर, म्हणूनच…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मराठा समाजाला शरद पवार Sharad Pawar यांच्यामुळेच आरक्षण मिळाले नाही, या सरकारला कुणाला आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकर यांनी पवारावर Sharad Pawar केलेल्या आरोपाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले आहे.

शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे.
त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडंही जातो, असे पाटील मराठा आरक्षणावर बोलताना म्हटले आहे.

हवाई सुंदरीकडून अब्जाधीशांची ‘पोलखोल’ ! खासगी विमान प्रवासादरम्यानचं ‘गुढ’ सांगितलं, म्हणाली – ‘लाखोंचा पगार,पण नको ते…’

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. राज्य सरकारने केलेल्या चुका त्या निकालातून स्पष्ट होत आहेत.

सरकारचा निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वटहुकूम काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण तात्पुरत टिकवले होते.
त्यानंतर आमच सरकार गेल. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवा होता.
ते केल गेल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झालेला नाही.

Corona : कोरोनात वेळेपूर्वीच ‘या’ औषधाचा वापर ठरू शकतो जीवघेणा, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलं सावध

राजकीय आरक्षण का, यामागचा तर्क सर्वोच्च न्यायालयाला हवा आहे, तो दिला जात नाही, असा आरोपही पाटील यांनी केला.

शरद पवार-देवेंद्र फडणवीस आणि खडसेंच्या भेटीगाठीमुळं राजकीय चर्चा

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवारांची भेट, त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळं सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर देखील पाटील यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार हे आजारी आहेत. आजारी असतानाही काम करत आहेत. अनेक जण त्यांना भेटून तब्येतीची विचारपूस करत आहेत. फडणवीसही त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असे पाटील म्हणाले. खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीबद्दल म्हणाल तर त्या घरात भाजपचा खासदार असल्याचे ते म्हणाले.

Also Read This : 

 

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला 5 वर्ष सॅलरी अन् मुलांना शिक्षण देणार

 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या

 

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक, 18 जिल्हे पूर्णपणे Unlock; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

 

बडीशेपपासून बनवा चेहर्‍यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’