अजित पवारांनी 74 हजार कोटीचा ‘सिंचन’ घोटाळा केला : अमित शाह

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज सोलापूरमध्ये सांगता झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप सरकारच्या कामांची माहिती देताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निषाणा साधला. शरद पवार यांचे लाडके अजित पवार यांनी 74 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. हजारो कोटींचा निधी दिला पण एक थेंब पाणी मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र मागे पडला अशी टीका अमित शाह यांनी केली.

सोलापूर येथे झालेल्या सभेमध्ये अमित शाह यांनी शरद पवार यांचे नाव घेत अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीची खिल्ली उडवत अमित शाह म्हणाले राष्ट्रवादीच्या बैठकीचा दरवाजा उघडला तर केवळ पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारच दिसतील. कारण बाकीचे आमच्या बाजूला आले आहेत.

पुढे बोलताना शाह म्हणाले, शरद पावर तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्राला काय दिले ते आगोदर सांगा. तसेच हाच प्रश्न शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना विचारा असे आवाहन शाह यांनी सोलापूरच्या जनतेला केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मागील पाच वर्षात विकास कामे केली आहे. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केल्यास महराष्ट्र नंबर वन बनेल असे शाह यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –