तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना लवकरात-लवकर मदत करावी, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रत्नागिरीतील तिवरे धरण फुटीमुळे राजकारणात अनेक रंग पाहायला मिळाले. या घटनेत अनेकांचे जीव गेले मात्र प्रशासन या घटनेबाबत उदासीनता दिसून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुर्घटनेतील पीडितांना मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवले आहे. पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त मदत करण्यात यावी. तसंच ज्या कुटुंबाला आधार राहिला नाही, त्यांना नोकरी द्यावी. तसंच ज्यांची जमीन लागवडीसाठी योग्य राहिली नाही, त्यांना निधीची तरतूद करावी, अशा मागण्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे या पत्राद्वारे केली आहे.

२ जुलैची रात्र रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील लोकांसाठी कालरात्र ठरली. २ जुलैच्या दिवशी रात्री तिवरे धरण फुटले. यात तेथील २३ रहिवासी नागरिक वाहून गेले. त्यातील २० जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप या दुर्घटनेतील ३ जणांचा तपास लागला नाही. त्यामुळे तेथील वातावरणात दुखवटा पसरला आहे. या घटनेनंतर अनेक राजकारण्यांनी तेथे भेट दिली. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच दुर्घटनाग्रस्त तिवरे धरण परिसराची पाहणी केली. पवारांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीच पवारांनी दुसऱ्या दिवशी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पीडितांना धीर देण्याची विनंती केली आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या पत्रात, मी ८ जुलैला तिवरे धरणफुटीमुळे बाधीत कुटुंबीयांची भेट घेऊन, नुकसानीची पाहणी केली. या भेटीत मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेवेळी सरकारने तातडीने मदतकार्य केलं. त्याच तत्परतेने तिवरे धरणग्रस्तांच्या समस्या सोडवाव्यात, अशी विनंती केली आहे.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात