भाजपला ‘शह’ देण्यासाठी पवारांचा डिजीटल ‘फंडा’ ; 9 जून रोजी शरद पवार त्यांच्या फेसबुक Page वर ‘LIVE’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मोदी लाट आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारत सर्वाधिक प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे राजकारणात सोशल मीडियाचा वापरही वाढला गेला. कारण सोशल मीडियामुळे आपण मोठ्या प्रमाणात एकमेकांशी कनेक्टेड राहतो. तेथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांबरोबर जोडले जातो. यंदा लोकसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले तर राष्ट्रावादीचा दारून पराभव झाला. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सोशल मीडियाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या Sharad Pawar या फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत. यावेळी ते तरूणांशी गप्पा करून त्यांच्या समस्या आणि त्यासोबत त्यांचे विचार जाऊन घेणार आहेत.

भाजपने सोशल मीडियाच्या आधारावर लोकांमधील व्याप्ती वाढवली. मात्र विरोधकांना ते काही जमलं नाही. म्हणूनच की काय त्यांचा लोकांवरील प्रभाव कमी झाला होता. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे त्याची तयारी आतापासूनच करणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा आपली व्याप्ती वाढवण्यासाठी काम करत आहे.

१० जून ला राष्ट्रावादीचा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमिवर हा कार्यक्रम घेण्याचे योजले आहे. यावेळी पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी शरद पवार बोलणार आहेत. तसंच फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहेत.