महाराष्ट्राचं ‘महाभारत’ ! सोनिया-पवार भेटीनंतरही ‘सत्तापेच’ कायमच, शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज संपूर्ण महाराष्ट्राची नजर होती ती शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील भेटीची. परंतू ती अपेक्षा निष्फळ ठरली. कारण राज्यात सत्ता कधी स्थापन होणार, कोणाचे सरकार स्थापन होणार, शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस राष्ट्रवादी तयार आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अशी शक्यता होती. परंतू ही अपेक्षा फोल ठरली. उलट सत्तास्थापनेचा पेच सुटेल असे वाटत असताना हा पेच आणखीनच वाढला.

सोनिया गांधींशी बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली अशी माहिती पवारांनी दिली. तसेच शिवसेनेविषयी आमची कोणतीही चर्चा झाली नाही असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

हे आहेत शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
1. सोनिया गांधींशी झालेली चर्चा ही फक्त राजकीय परिस्थिती बद्दल होती. शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधित चर्चा झाली नाही.
2. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
3. संजय राऊत काय बोलतात हे मी कसं सांगणार, हे त्यांनाच विचारा.
4. आमच्याकडे 6 महिने आहेत. तसेच कोणाबरोबर जायचे आणि कोणाबरोबर जायचे नाही हे अजून निश्चित नाही.
5. राज्यातील विधीमंडळातील नेत्यांची जी चर्चा झाली, ती किमान समान कार्यक्रमाविषयी नव्हती.
6. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा नाही.
7. आमचे फक्त 54 आमदार आहेत, आम्ही कशी सत्तास्थापन करणार?
8. कोणत्याही चर्चे आधी मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर मित्रपक्षांना विश्वासात घेणे आवश्यक आहे.
9. भाजपबरोबर जाणार का या प्रश्नला उत्तर देताना पवार म्हणाले, आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढलो.
10. सध्या फक्त काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल आम्ही बोलतो, शिवसेनेबद्दल नाही.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like