Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा (Chhatrapati Shivaji College Satara) येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उद्घाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सातारा (Satara News) दौर्‍यावर आले होते. त्यावेळी बोलताना पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार व्यवस्थित सुरू असून ते स्थिर सरकार आहे. यामुळे जे अस्वस्थ आहेत तेच राष्ट्रपती राजवटीची विधाने करत आहेत. त्यांची दखल महाराष्ट्रात घेतली जात नाही,’ असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होईल असं वक्तव्य केलं होतं. यानंतर सातारा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्या विधानावरुन चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. त्यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकारला मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा असल्याने सरकार स्थिर आहे.

पुढे पवार म्हणाले, ‘सरकार स्थिर असल्यानेच भाजप (BJP) आणि चंद्रकांत पाटलांकडून (Chandrakant Patil) राष्ट्रपती राजवटीची (Presidential reign) भाषा केली जातेय.
सरकारला धोका नसल्यानेच ते अस्वस्थ झाले असून त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत.
यापूर्वी देखील त्यांनी अशी विधाने केली आहेत. मात्र, त्यांच्या विधानाची दखल महाराष्ट्रात घेतली जात नाही.
राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतच्या कारणांची जी यादी त्यांनी सांगितली आहे ती त्यांनाच विचारा,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

 

Web Title :- Sharad Pawar | maharashtra does not take interference of chandrakant patil sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर

 

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

 

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई | तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Devendra Fadnavis | पडळकरांच्या सुरक्षेसाठी फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘पोलीस त्यांच्या बापाचे आहेत का?’