Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपाच ! ‘महाविकास’ सरकारसाठी 24 तास महत्वाचे, शरद पवाराचे मोठं वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अडचणीत सापडलं आहे, यादरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) नेते अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारवरील संकट टळलेलं नाही. सरकारसाठी 24 तास महत्वाचे आहेत, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपच (BJP) असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

 

सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे
राज्यात सुरु असलेल्या पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक आज (गुरुवार) झाली. त्यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. महाविकास आघाडी सरकार वरील संकट टळलेले नाही. सरकारसाठी 24 तास महत्वाचे आहेत, असं मोठं वक्तव्य पवारांनी केली.मविआ सरकार जाण्याच्या तयारीत आहे, आमदारांनी (MLA) विरोधी पक्षामध्ये बसण्याची तयारी ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

शिंदेची व्यवस्था करणारे कोण हे मला माहिती
शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले.
अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे.
एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठिंबा असल्याचं सांगितलं.
त्यानुसार देशात सहा राष्ट्रीय पक्ष असून भाजप सोडून इतरांचा त्यांच्यामागे हात आहे का याचा विचार करावा.
गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेंची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नाही, ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | maharashtra political crisis ncp sharad pawar on ajit pawar and shivsena eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

 

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

 

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’