भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार ठाकरे बंधूंना एकत्र आणणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले तरी अद्याप सरकार स्थापनेचे घोडे अडले आहे. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे तर भाजपने मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही तसेच प्रमुख खाती सोडायला तयार नाही. राज्यात सुरु असलेल्या राजकीय पेचात आता नवीन कलाटणी देणारी खेळी शरद पवार खेळत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मागील अनेक दिवसातल्या घडामोडी पाहता या चर्चेला बळ मिळाले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातल्या ओल्या दुष्काळाच्या निमित्ताने एकमेकांशी फोनवरून चर्चा केली. तर त्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, सध्या प्रकाश झोतात असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील अलीकडच्या काळात दोन वेळा शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे विश्वासू संदीप देशपांडे यांनी देखील नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या सगळ्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरे बंधूमध्ये असलेला दूरवा दूर करण्यासाठी शरद पवार दुवा बनले असून त्यांना एकत्र आणण्यासाठी सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

शिवसेनेला बळ देण्यासंबंधी दोन्ही काँग्रेसमध्ये मतमतांतर असले तरी या संदर्भातील सर्वाधिकार शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला बळ देऊ शकते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा किंवा द्यायचा नाही याचा अधिकार सोनिया गांधी यांनी शरद पवारांना दिला असल्याचे या आधीच स्पष्ट केलंय.

सत्ता स्थापनेमध्ये शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होतील. आदित्य ठाकरे हे शरद पवारांच्या तालमीत तयार होतील आणि त्यांची राजकीय वाटचाल सुरु होईल. या दृष्टीने ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेण्यासाठी शरद पावर उत्सुक असल्याचे बोललं जात आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसला होऊ शकतो आणि त्याचवेळी भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. त्यामुळे शरद पवारांच्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची चर्चा आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास