Sharad Pawar | शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं, कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात बैठक सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bangla) या दोन नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. यामध्ये राज्य आणि देशातील सध्याच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर (political Development) चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात मागील काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी होत असून यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात होत असलेल्या बैठकीकडे (Meeting) सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय रणनीती ठरते ते आगामी काळात समजेल परंतु सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

कोणत्या मुद्यावर होणार चर्चा?
राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विशेष म्हणजे देशातील पाच राज्यातील विधानसभेचा निकाल (Legislative Assembly Result) जाहीर झाला यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या यशानंतर नवी दिल्लीत भाजपने (BJP) प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आनदोत्सव साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Agency) होत असलेल्या कारवायांवरुन विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचा समचार घेतला. भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी गतीने केली जाईल, असा इशारा मोदींनी दिला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी राज्यातील प्रमुख मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने (ED) टापे टाकले होते. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवाईवरुनही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु असून या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पेच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनात (Winter Session) यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. तसेच ही निवडणूक (Election) आवाजी पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरुन राज्य सरकार (State Government) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. त्यामुळे अध्यक्षपदाचा पेच सुटला नव्हता. आता या अधिवेशनात तरी हा तिढा सुटेल अशी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आशा आहे. या विषयावरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. (Sharad Pawar)

 

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) मुद्दा प्रचंड पेटला आहे.
ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विधी मंडळात नुकतंच प्रभाग रचना विधेयक मंजूर करण्यात आले.
यावर राज्यपालांनी देखील सही केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.
याच मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच राज्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक घटनांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते.

 

Web Title :- Sharad Pawar | meet between uddhav thackeray andsharad pawar at varsha bungalow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

 

Pune Corporation | मुंढवा येथील 24 मी. रुंदीचा डी.पी.रस्ता क्रेडीट नोटच्या बदल्यात विकसित करणार; स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत मान्यता