Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं भेटीचं कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई – Sharad Pawar meet CM Eknath Shinde | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी अचानक वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) दाखल झाले. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे परदेश दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. (Sharad Pawar meet CM Eknath Shinde)

 

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती, मराठा मंदिर संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच ही राजकीय भेट नव्हती, सदिच्छा भेट होती, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

 

ठाकरे गटाची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) म्हणाले, ते राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे गेले आहेत. एकनाथ शिंदेंकडे गेलेले नाहीत. काही प्रश्न घेऊन राजकीय पक्षांची लोकं भेटत असतात. जिल्हा नियोजनाच्या बैठकीतही पवार साहेब गेले होते. ही भेट राजकीय आहे का प्रशासकीय आहे? याचं उत्तर मी देऊ शकत नाही.

 

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना वर्षावर जाऊन भेटण्याची परंपरा आहे. लोकांचे विषय घेऊन गेले असतील, तर त्यात मला काही वाटत नाही.
शरद पवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर आले होते. सरकार घटनाबाह्य असलं तरी प्रशासन चालवायची
जबाबदारी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे असते, असा टोला सचिन अहिर यांनी लगावला.

 

 

 

Web Title :  Sharad Pawar Meet CM Eknath Shinde | sharad pawar meets chief ministereknath shinde video of varsha bungalow in front

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा