सत्तेची कोंडी फुटणार ? उद्या दिल्लीत सोनिया गांधी – शरद पवारांची भेट

पुणे : पोलीनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी (दि.18) दिल्लीत बैठक होणार आहे. पुण्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज (रविवार) पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

नवाब मलिक म्हणाले, आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं मलिक म्हणाले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like