विधानसभा काबीज करण्यासाठी शरद पवारांच्या ‘मॅरेथॉन बैठका’ ; असे आहे वेळापत्रक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादीचा टिकाव लागला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत पक्षासाठी प्रयत्न सुरु केले आहे. लोकसभेत दारूण पराभव पाहिल्यावर विधानसभेसाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याचे त्यांनी ठरवले आहे. या कामाचा श्रीगणेशा ते १३ जूनपासून करणार आहेत.

पक्षाची जागा विधानसभेत पुन्हा मिळवण्यासाठी विधानसभेत स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणार आहेत. तसंच यांच्या प्रश्नांवर शरद पवार कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच लोकसभेत झालेले मतदान, विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार अशा विषयांवर चर्चा करून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहेत.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धाप दिनाच्या कार्यक्रमात पक्षसंघटनेत बदल करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. ‘लोकांना परिवर्तन हवं आहे. त्यामुळे नव्या चेहेऱ्यांना, नव्या रक्ताला संधी दिली पाहिजे, येत्या विधानसभा निवडणुकीत हा बदल करावा लागेल. कष्टकरी तरूण चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी, असं म्हणत शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी सुचनाही दिली होती.

दरम्यान, नेहमीचेच चेहरे निवडणुकीत पाहून लोकांना कंटाळ आला आहे. तेच तेच नेते आणि त्यांच्या जागेवर पुन्हा त्यांचीच मुलं या घराणेशाहीवर लोक नाराज आहेत. हे शरद पवार यांच्या लक्षात आलेलं दिसत आहे. तसंच शरद पवार यांनी पक्षसंघटनेत बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षातील जुन्या नेत्यांची चिंता वाढणार आहे. कारण त्यांच्या जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता राष्ट्रवादीत आहे.

कोण-कोणत्या भागात आणि कधी होणार बैठका

कोकण – 13 जून

उत्तर महाराष्ट्र – 14 जून

पश्चिम महाराष्ट्र – 15 जून

विदर्भ – 21 जून

मराठवाडा – 23 जून

आरोग्यविषयक वृत्त –

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

 

Loading...
You might also like