Sharad Pawar | पवार-शिंदेंची सोयरीक सांगत शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले- ‘मुलीसाठी जावयाच्या सूचना ऐकाव्याच लागतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association Election) च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजपा (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) एकत्र आले आहेत. या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. ऐकमेकांचे कट्टर विरोधक सध्याच्या राजकीय चिखलफेकीच्या वातावरणात एकत्र आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हे सर्व नेते केवळ एकत्रच आले नाहीत तर त्यांनी एकमेकांवर मिश्किल टिपण्णी देखील केली. याच कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पवार-शिंदे सोयरीक मुख्यमंत्र्यांना सांगितली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला (Mumbai Cricket Association Election 2022).

पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांकडे पहात म्हटले की, माझे सासरे शिंदेच… आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे.
त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्याने
विचार करावा, अशी विनंती करतो. पवारांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार
(Ashish Shelar), शिवसेना आणि शिंदे हे सर्व आपापसातील मतभेद विसरून एक झाले आहेत.
पवार-शेलार पॅनेल (Pawar-Shelar Panel) ही निवडणूक लढवत आहे.
पवार-शेलार पॅनले उमेदवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमोल काळे (Amol Kale) यांचा
थेट सामना माजी कसोटीवीर संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्याशी होत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर
(Milind Narvekar) सुद्धा कार्यकारिणी सदस्य पदाची निवडणूक लढवत आहेत.
आज चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमच्या (Wankhede Stadium) परिसरात एमसीए निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे.

Web Title :- Sharad Pawar | mumbai cricket association election 2022 sharad pawar says my father in law was shinde gives an epic reply devendra fadnavis ncp bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा