Sharad Pawar | अखेर शरद पवारांना ‘कोरोना’नं गाठलं, तिसर्‍या लाटेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा Positive

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढताना दिसत आहे. अनेक नेते, मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनाही कोरोनाची बाधा (Corona Test Positive) झाली आहे. याबाबत माहिती स्वत: शरद पवार यांनी आपल्या ट्विटवरुन दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचं पवार यांनी सांगितलं आहे.

 

”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Sharad Pawar Corona Test Positive) आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वत: ची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.” असं शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

 

दरम्यान, शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट केलं आहे. की, ”आदरणीय पवार साहेबांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो, या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या.” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar become corona positive informed by tweet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा