Sharad Pawar | ED चा ससेमिरा ! शरद पवारांनी बोलावली NCP च्या नेत्यांची तातडीची बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) अनेक नेते, मंत्री यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीच्या नोटीसा, छापे यांचे स्तर सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा देखील समावेश आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शरद पवार (Sharad Pawar) कामकाजाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

राज्यात ठाकरे सरकारमधील (Thackeray government) नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटीस,
भाजपची (BJP) नुकतीच झालेली जनआशीर्वाद यात्रा (jan ashirwad yatra) तसेच भाजपकडून केला जाणारा हल्लाबोल या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही बैठक बोलवल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही बैठक मंगळवारी (31 ऑगस्ट) सायंकाळी बोलवण्यात आली आहे.
याबैठकीत अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

हे नेते उपस्थित राहणार

शरद पवार यांनी उद्या सायंकाळी बोलवलेल्या बैठकिला पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये अजित पवार (Ajit Pawar), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राजेश टोपे (Rajesh Tope), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व 16 मंत्र्यांचा समावेश असणार असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार हे नियमित अंतराने आपल्या पक्षातील नेत्यांची बैठक घेत असतात.
या बैठकीत ते मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असतात.
प्रत्येक मंत्र्यांच्या कामकाजाचे मुल्यमापन केले जाते.
ज्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याची गरज आहे, त्यांना सूचना, सल्ले दिले जातात.
तसेच राज्यातील राजकीय विषयांवर या बैठकित चर्चा अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ईडीने नुकतीच शिवसेनेचे नेते अनिल परब (Shivsena leader Anil Parab) यांना नोटीस पाठवली आहे. तर शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavna Gavli) यांच्या पाच कार्यालयावर छापे टाकण्यात आले. याशिवाय अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित काही ठिकाणावर छापे टाकले. या एकूण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनिती काय आखणार, यासंदर्भार राज्याच्या राजकारणात चर्चा रंगू लागली आहे.

 

Web Title : Sharad Pawar | ncp chief sharad pawar calls party leaders meeting 31 august

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Virginity Test and Repairs | व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी ही पद्धत अवलंबत आहेत तरूणी, बॅनची मागणी

Post Office च्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा प्राप्तीकराचा लाभ, जाणून घ्या याबाबत

ED Raid | दिवसभर ईडीचा धडाका ! शिवसेना खासदार गवळी, अनिल परब यांच्यानंतर आता ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मागे ED