गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज (गुरूवारी) गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. येथील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार यांनी अमरावती येथे झालेल्या हिंसाचारावरून (amravati violence) भाजपवर (BJP) टीका केली आहे. ‘भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे,’ असा हल्लाबोल पवार यांनी यावेळी केला आहे.
त्यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, सध्या सांप्रदायिक विचार, जातीयवाद्यांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न होतोय. जातीवादी विचार माणसामाणासात द्वेष निर्माण करत आहे. हा विचार राबवणाऱ्या शक्तिंना खड्यासारखं बाजूला ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आदिवासी अशा शक्तींना कधीही बळी पडत नाही, असं ते म्हणाले. तसेच त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद (amravati violence) का उमटले? असा सवाल त्यांनी केला. भाजपची (BJP) भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
–
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आदिवासी संमेलनात वनवासी हा शब्द वापरला. त्यांच्या भाषणात आदिवासी हा शब्दच नव्हता. पण आदिवासी समाजाला वनवासी शब्द मान्य नाही, असा टोलाही शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान मोदींना लगावला आहे. आदिवासी हा जंगलाचं रक्षण करण्याचं काम करतोय. जल, जमीन, जंगलाचं रक्षण आदिवासी करत आहे. त्यामुळे आदिवासींकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे, असं ते म्हणाले. दरम्यान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी द्यावा. वेळप्रसंगी सरकारने कर्ज काढावं. पण शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दिलासा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar criticizes bjp over amravati violence
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update