Sharad Pawar | आजोबा काळजी घ्या! शरद पवार यांना ‘कोरोना’ झाल्यावर ‘रोहित’ आणि ‘पार्थ’चं भावनिक ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोनाची लागण (coronavirus Infection) झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी कळजी करत लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली.

 

यानंतर शरद पवार यांचे नातू (Grandson) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांनी भावनिक पोस्ट केली आहे. या दोन नातवांनी भावनिक ट्विट (Emotional Tweet) करत आजोबांच्या प्रकृतीविषयी (Health) काळजी व्यक्त केली आहे.

 

योद्धा कधी पराभूत होत नसतो!
शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच आमदार रोहित पवार यांनी भावनिक ट्विट केलं आहे. यामध्ये ते म्हणतात,’आजोबा (Grandfather) एरवी सर्वांचीच काळजी तुम्हा घेता पण आज तुमच्या कोविडच्या (Covid) ट्विटने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’

 

आजोबा काळजी घ्या

दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांचे पूत्र पार्थ पवार यांनीही ट्विट करत आजोबांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘आजोबा काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल’

 

पंतप्रधानांचे आभार
शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन विचारपूस केली. याबाबत स्वत: शरद पवार यांनी ट्विट करुन माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. त्यांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar grandson rohit pawar and parth pawar praye to sharad pawar health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णसंख्या उतरणीला, गेल्या 24 तासात  ‘कोरोना’चे 28,286 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Coronavirus in India | भारतातून ‘कोरोना’ कधी जाणार? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची माहिती

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्या थेट मंत्रालयात ! कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून केल्या फाईल्स चेक, चर्चेला उधाण