Sharad Pawar | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णयावर शरद पवारांचं महत्वाचं विधान, म्हणाले – …तरी वाईट वाटायचं कारण नाही’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर अनेकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यावेळी ते बारामतीत (Baramati News) पत्रकारांशी बोलत होते.
सुपर मार्केटमध्ये वाईन उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयावर भाजपसह (BJP) काही संघटनांनी विरोध केला आहे. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं ? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार म्हणाले, ”राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला तरी त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही,” असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.
पुढे शरद पवार म्हणाले, ”देशभरातील सर्वच राज्यांतील दुकानांत देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यात 18 वाईनरी आहेत. ही वाईन फक्त मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने मंजुरी दिलीय. वाईनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. परंतु, त्याला विरोध होत असल्याने सरकारने याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचं कारण नसल्याचं ते म्हणाले.”
Web Title : Sharad Pawar | ncp chief sharad pawar makes statement about maha
vikas aghadi government permission to sale wine in super markets
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट
Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या
Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’