Sharad Pawar | ‘उत्तर प्रदेशात झालं ते ठाकरे सरकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गुढीपाडवा (Gudhipadva) आणि हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिले. ते कोल्हापूरमध्ये (Kolhapur) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

राज ठाकरे तीन ते चार महिने भूमिगत होतात. मग त्यानंतर एखादं लेक्चर (Lecture) देतात. मग पुन्हा तीन ते चार महिने भूमिगत (Underground) होतात, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. त्यांच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट्य आहे, असंही पवार (Sharad Pawar) म्हणाले.

उत्तर प्रदेशात झाले ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही
राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) योगी सरकारच्या (Yogi Government) कामाचं कौतुक केलं.
त्यांना उत्तर प्रदेशात नेमकं काय दिसलं माहित नाही.
योगींच्या कार्यकाळात लखीमपुरला (Lakhimpur) शेतकऱ्यांना कार खाली चिरडण्यात आलं.
शेतकऱ्यांचे आंदोलन (Agitation) वर्षभर सुरु होतं. परंतु त्याकडे तिथल्या सरकारचे लक्ष गेलं नाही.
कितीतरी गोष्टी अशा आहेत की, ज्या उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. योगींच्या राजवटीच्या काळात आणि अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असे जर राज ठाकरे म्हणत असतील, तर मला त्यावर काही बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात असे कधी उद्धव ठाकरेंचे सरकार (Uddhav Thackeray Government) होऊ देणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवला.

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar replied raj thackeray over criticism and praised uddhav thackeray govt

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा