Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात सारथी संस्थेचे (Sarathi Sanstha) आंदोलन पेटल्यानंतर विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्याकडे असलेली सारथीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी मागील काही महिन्यात अनेक चांगले बदल व सुधारणा केल्या आहेत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सारथीचा कारभार उत्तम सुरु असताना आता राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सारथीमध्ये थेट लक्ष घातले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी (दि.1) सारथी संस्थेची सध्याची कामे व भविष्यातील नियोजन याचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखालील सारथीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर
(Ajit Nimbalkar), संचालक मधुकर कोकाटे (Madhukar Kokate), व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (Ashok Kakade) यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठी व मराठा कुणबी समाजातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी स्थापन झालेली सारस्थी संस्था स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे.
महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सारथीची जबाबदारी सुरुवातीला काँग्रेसचे (Congress) मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात आली होती.
पुण्यात सारथी संस्थेचे आंदोलन पेटल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली होती.

 

‘सारथी’ गतीमान काम करेल ही अपेक्षा

अजित पवारांकडे सारथीची धुरा आल्यानंतर त्यांनी काही तासात सारथीच्या निधीचा प्रश्न मार्गी लावला होता.
गेल्या एक वर्षात साथीला मुख्य कार्यालयाची इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिली.
तसेच बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला. एवढेच नाही तर सारथी संस्थेमुळे नुकत्याच झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत (UPSC exam)
मराठा वाढला असून 21 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत सारथीच्या नवीन इमारतीचे सादरीकरण करण्यात आले.
याशिवाय सध्या सुरु असलेले उपक्रम आणि भविष्यातील विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
आता शरद पवार यांनी थेट सारथीमध्ये लक्ष घातल्याने सारथीचे काम गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title : Sharad Pawar | ncp chief sharad pawars direct attention sararthi sanstha now responsibility lies ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेयरने 10 वर्षात दिला तब्बल 8000 टक्के रिटर्न; 10 हजार रुपये झाले 8 लाख

Multibagger Stock | केवळ 12 रुपयाचा शेयर आता 945 वर पोहचला, 1 लाखाचे झाले 80 लाख रुपये

Uddhav Thackeray | … म्हणून भाजप खासदाराने मानले CM उद्धव ठाकरे यांचे आभार