Sharad Pawar | शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मलिकांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र तेव्हापासून मलिकांचे आरोपाचे सत्र सुरूच आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी नवाब मलिकांची आज (बुधवारी) पाठराखन केली आहे.

दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष योगानंद शास्त्री (Yogananda Shastri) यांनी आज (बुधवारी) दिल्ली येथे शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पवार म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर होत असेल, तर तसं करणाऱ्यांना एक्सपोज करणं हे गरजेचं आहे. गैरप्रकार रोखणं गरजेचं आहे. ते काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर केंद्र सरकारनं (Central Government) तातडीनं कारवाई करायला हवी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मलिकांनी एनसीबीमधील गैरप्रकारांविरुद्ध सुरू केलेल्या लढाईचं त्यांनी समर्थन केलं आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, भाजपच्या (BJP) राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हास्यास्पद आहे.
सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं, तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाला, असा टोला त्यांनी लगावला.
‘अनेक वर्षांपासून भाजपसोबत काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत आहेत.
मर्यादित कार्यकाळासाठी ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेनं पाहिलं आहे.
सत्ता मिळत नसल्यानं नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले.

Web Title : Sharad Pawar | ncp leader sharad pawar backs nawab malik in his fight against wrongdoings of ncb

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;
विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज

ICC च्या ‘या’ निर्णयामुळे BCCI ला मोठा दिलासा, 1500 कोटींची होणार बचत

Satara Crime | साताऱ्यातील व्यावसायिकाला 30 लाखाच्या खंडणीसाठी बॉम्बनं उडवून देण्याची परदेशातून धमकी