Sharad Pawar | ‘जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय’ – शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Sharad Pawar | राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर (Modi government) जोरदार निशाणा साधला आहे. जिथं भाजपची (BJP) सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे. केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा मुद्यावरुन पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी शरद पवार हे आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार (Sharad Pawar) बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे.
तर तीन हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे.
दरम्यान, सध्या सीबीआय, आयकर विभाग, एनसीबी आणि ED सारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी अनेक सरकारं बघितली आहेत. पण राज्य सरकारच्या समस्यांबाबत केंद्र सरकारचा दृष्टिकोन नेहमी सहानुभुतीचा असायचा.
पण आजचं हे भाजपाचं सरकार राज्यांना विशेष करून जिथे गैरभाजपा सरकारं आहेत त्यांना काहीना काही करून दोषारोप करायचा किंवा
आपल्या सत्तेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करायचा. हा दृष्टिकोन सध्या स्वीकारलेला आहे.
तो ठिकठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आज या देशात काही यंत्रणा अशा आहेत, त्या यंत्रणांचा गैरवापर हा पदोपदी केला जातो. असं पवार म्हणाले.

 

Web Title : Sharad Pawar | NCP leader sharad pawar in pimpri chinchwad said central government bjp ed cbi income tax department

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Girish Mahajan | काय सांगता ! होय, माजी मंत्री गिरीश महाजनांनी चक्क सिनेमा निर्मात्याकडे केली ‘ही’ मागणी; म्हणाले – ‘अजितदादा, जयंत पाटील….’

Ananya Pandey | अनन्या पांडे लग्न करतेय? हातामध्ये हिरवा चुडा? सोशल मीडिया वरती फोटोज झपाट्याने व्हायरल.

Chhagan Bhujbal | ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’ – छगन भुजबळ