Sharad Pawar NCP | लोकसभेतल्या पिपाणी चा आवाज विधानसभेला बंद करा ; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar NCP | महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये ‘पिपाणी’ मुळे ‘तुतारी’ चा खेळ बिघडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या गोष्टीला दुजोरा दिला होता. लोकसभेत महाराष्ट्रातील मतदारांचा तुतारी आणि पिपाणीमध्ये साम्य असल्याने संभ्रम झाला. याचा फटका म्हणजे पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची सीट पडण्यास हे चिन्ह कारणीभूत ठरल्याचा दावा, जयंत पाटील यांनी केला होता. (Maharashtra Assembly Elections 2024)

त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला असा फटका बसू नये यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे. लोकसभेला पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला. तो विधानसभेला बसू नये, यासाठी शरद पवार यांनी दक्षता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.

त्यामध्ये फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती करण्यात आली असून फ्री सिम्बॉल मध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही पत्रात म्हंटले आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : तळेगाव दाभाडे परिसरातून चार पिस्टल व सहा काडतुसे जप्त, तिघांना अटक

Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

Pune Crime News | पुणे : मोबाईल चोरीचे कनेक्शन थेट चीनपर्यंत, स्वारगेट पोलिसांची कारवाई

Yerawada Pune Crime News | पुणे : बहिणीला पळून नेल्याच्या कारणावरुन तरुणीच्या भावाकडून ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने वार करुन खून, येरवडा परिसरातील घटना