Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | आता चिंचवडच्या आखाड्यात शरद पवार राजकीय डाव टाकणार? बडा नेता तुतारी फुंकण्याच्या तयारीत?

Sharad Pawar Vs Ajit Pawar | After Jansanman Yatra, Sharad Pawar Group's Swabhiman Yatra in Baramati; Challenge to Ajit Pawar
ADV

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे (Maharashtra Assembly Election 2024). त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि राजकारण रंगले आहे. जागावाटपावरून ज्या ठिकाणी उमेदवारी मिळेल तिथे नेते पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग वाढले आहे.

भाजपचे नेते समरजीत घाटगे (Ghatge Samarjeetsinh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. इंदापूर मतदारसंघात (Indapur Assembly) उमेदवारीवरून धुसफूस सुरु असल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

आता शरद पवार चिंचवड मतदारसंघात (Chinchwad Assembly) गळ टाकण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे. नाना काटे (Nana Kate) यांची जयंत पाटलांशी (Jayant Patil) चर्चा झाल्याची माहिती आहे.

चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. त्यामुळे नाना काटे तुतारी (Tutari) फुंकण्याची शक्यता आहे. तूर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत, मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तरी मी चिन्हावरचं ही निवडणूक लढणार असे म्हणत नानांनी संभ्रमावस्था वाढवलेली आहे.

महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपात चिंचवड महायुतीची जागा भाजपला, तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता आहे, तर या मतदारसंघातून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.(Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP)

चिंचवडची जागा घड्याळाला मिळाली नाही तरी देखील मी निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता ही जागा भाजपाने सोडली नाही तर या मतदारसंघात पुन्हा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शरद पवार या मतदारसंघाबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

हे देखील वाचा

PMC Property Tax Department | मिळकत कर विभागातून बदली झालेल्या 20 टक्के निरीक्षकांना पुन्हा त्याच विभागात संधी !

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन; भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Total
0
Shares
Related Posts