Sharad Pawar | नवाब मलिकांबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय?, बैठकीत एकमत झाले?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारला (State Government) विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली (NCP Meeting in Mumbai) आहे. मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली असून हे प्रकरण न्यायालयात आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) आज बोलवलेल्या बैठकीत मलिक यांचा राजीनामा (Resignation) न घेता त्यांच्या खात्याचा कारभार दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात यावा अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी बैठका सुरु आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादीचे मोजकेच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) बैठकीत हजर आहेत. या बैठकीमध्ये मुंबई कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती, नवाब मलिक राजीनामा, पेन ड्राईव्ह प्रकरणात (Pen Drive Case) पक्षातील नेत्यांची नावे आल्याने पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Brihanmumbai Municipal Corporation Election) तोंडावर मुंबईला नवा राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष मिळणार आहे.
नवाब मलिक यांच्या जागी नव्या कार्याध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तर मंत्रीपद राजीनामा विषय स्थगित होत असल्याची माहिती समोर येत आहे.
नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा निर्णय कायम ठेवून त्यांच्याकडील खात्याचा कार्यभार इतर कोणाला द्यावा का? तसेच हा कार्यभार कोणाला द्यावा याबाबत चर्चा झाली. काम थांबू नये यासाठी हा निर्णय घ्यावा, अशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपने केली होती.
परंतु मलिक यांचे प्रकरण हे भाजपने मुद्दाम काढले आहे. त्यामुळे मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीने फेटाळून लावली होती.
तसेच मलिक यांच्या प्रकरणात न्यायालयात लढा देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती.
Web Title :- Sharad Pawar | new mumbai ncp president to replace nawab malik a big decision of sharad pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Holi Tips For Pregnant Women | गर्भवती महिलांसाठी होळी खेळणं आहे का सुरक्षित?, वाचा सविस्तर