नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार प्रचार सुरु झाला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिली सभा मुंबईतल्या बीकेसी मैदानावर (BKC Ground) पार पडली. दरम्यान शरद पवार आज (दि.७) नागपूरमध्ये तीन सभा घेणार आहेत. या अनुषंगाने त्यांनी नागपूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे असं शरद पवार यांनी म्हंटलं .
शरद पवार म्हणाले, ” महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आमचा प्रचार सुरु झाला आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मीदेखील त्या सभेला उपस्थित होतो.
प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे. मी आता नागपूरला आहे. नागपूरमध्ये तीन सभा घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. आजपासून राज्यांमध्ये नेते दौऱ्यांवर निघाले आहेत”, असे शरद पवार यांनी म्हंटलं आहे.