Sharad Pawar-Nilesh Rane | ‘मला संशय येत आहे शरद पवार हेच दाऊदचे माणूस आहेत’; भाजपच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य !

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar – Nilesh Rane | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) तुरूंगात आहेत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा (Money laundering) आरोप लावण्यात आला आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने (BJP) त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) त्यांचा राजीनामा घेतला नाही. मात्र अशातच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar-Nilesh Rane)

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) मराठा होते त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का ?, मला संशय येतो की शरद पवार हेच दाऊदचे माणूस आहेत. दाऊदच्या बहिणीसोबत ज्याने व्यवहार केला त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही ?, नवाब मलिक लागतो कोण शरद पवारांचा ?, असा सवालही निलेश राणे यांनी केला. सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना निलेश राणेंनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला.

नवाब मलिकांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली तेवढी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वेळी कुठे होती ?, असा सवालही निलेश राणे यांनी केला. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) बोलताना, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे मात्र निवडणुका वेळेत घेतल्या जाव्यात त्याला उशिर होता कामा नये, असा सल्लाही राणेंनी (Nilesh Rane) दिला.

 

दरम्यान, आधीच विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे.
त्यात आता फडणवीसांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोटीस पाठवली आहे.
अशात राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Sharad Pawar-Nilesh Rane | nilesh rane doubts on sharad pawar by saying he may be person of dawood ibrahim

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा