Sharad Pawar On Ajit Pawar | आर.आर पाटलांवरील टीकेवरून शरद पवारांनी अजित पवारांना फटकारलं; म्हणाले,…

बारामती: Sharad Pawar On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान प्रचार सभेत नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. “७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून (Irrigation Scam Maharashtra) आर.आर. पाटील (RR Patil) यांनी माझी खुली चौकशी करावी म्हणून फाईलवर स्वाक्षरी केली. केसानं गळा कापायचे धंदे झाले”, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला होता.

अजित पवार यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. दरम्यान आज अजित पवारांच्या या विधानावर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी त्यांना फटकारल्याचं पाहायला मिळालं.

“सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही काढला नाही. आर.आर. पाटील यांची प्रतिमा चांगली होती. स्वच्छ होती. त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं हे योग्य नाही”, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.

यावेळी पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही निशाणा साधला आहे. ” सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली. त्यात काही चुकीचं नाही असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेच्या शपथेचा तो भंग आहे,” असे पवार यांनी म्हंटले.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर