Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या दिवाळी पाडव्यावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – ‘मी अस्वस्थ…’

बारामती: Sharad Pawar On Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार काही नेत्यांना घेऊन महायुतीत (Mahayuti) सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र सुप्रिया सुळे मोठ्या बहुमताने विजयी झाल्या.

दरम्यान आता बारामतीत (Baramati Assembly Election 2024) पहिल्यांदाच पवारांचे दोन पाडवा मेळावे झाले. गोविंद बागेत (Govindbaug Baramati) शरद पवार आणि काटेवाडीत अजित पवारांचा पाडवा मेळावा पार पडला. शरद पवार यांच्या पाडवा मेळाव्याला अनेकांनी हजेरी लावली होती. पाडवा मेळावा झाल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पाडवा मेळाव्यावर भाष्य केले. अनेक वर्षांपासूनची पाडवा मेळाव्याची परंपरा कायम राहायला हवी होती, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, ” बारामतीमध्ये दोन पाडवा व्हायला नको अशी लोकांची भावना आहे. पाडव्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. पाडवा या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणात आम्ही सर्वजण जमतो, ही जुनी पद्धत आहे. ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण आता ठीक आहे. लोकांना डबल ठिकाणी जावं लागलं. त्यांना त्रास झाला. त्यामुळे मी अस्वस्थ आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

Total
0
Shares
Related Posts