Sharad Pawar On Amruta Fadnavis | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून पवारांनी अमृता फडणवीसांना फटकारलं; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Amruta Fadnavis | राणा दाम्पत्याला (MP Navneet Rana & MLA Ravi Rana) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Amruta Fadnavis) यांनी अमृता फडणवीसांना फटकारलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा धोरणात्मक अधिकार (Strategic Rights) सर्वांना आहे पण त्यांचं नाव एकेरी भाषेत घेऊन त्यांच्यावर टीका करणं शोभत नाही. कारण मुख्यमंत्री हे नाव असून एक संस्था आहे त्यामुळे त्यावर टीका करणं हे योग्य नसल्याचं शरद पवार (Sharad Pawar on Amruta Fadnavis) म्हणाले. पुण्यामध्ये (Pune) माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच त्यांनी राणा दाम्पत्यावरही निशाणा साधला.

 

जर कोणाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता, पण तो कार्यक्रम माझ्या दारात येऊन
करणार म्हटलात तर माझ्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता झाली, त्याला दोष देता येणार नाही.
बघू आता वातावरण आणखी किती खाली जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?
उध्वस्त ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा?, असा सवाल करत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खाली पर्याय दिले होते.
त्यामध्ये, वसूली च्या ताब्यात, विकृत अघाडीच्या ताब्यात, लोड sheddingच्या ताब्यात, (Traffic Jam) आणि अव्यवस्थेच्या ताब्यात,
गुंडांच्या ताब्यात असे पर्याय होते. याबाबत त्यांनी ट्विट केलं होतं.

 

Web Title :- Sharad Pawar On Amruta Fadnavis | NCP Chief sharad pawar criticized without mentioning the name of amrita fadnavis over cm uddhav thackeray single mention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Municipal Corporation (PMC) | व्यावसायिक मिळकतींना ‘मिटर’द्वारे पाणी पुरवठा होतोय की नाही? सर्वेक्षण करून तातडीने मिटर बसविणार – पुणे महापालिका

 

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

 

Pune Crime | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त; साडे तीन लाखांचे 11 पिस्टल जप्त (व्हिडिओ)