इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Sharad Pawar On Dattatray Bharne | हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत. हर्षवर्धन पाटलांनी तुतारी (Tutari) हातात घेतल्याने इंदापूरच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. (Harshvardhan Patil Join Sharad Pawar NCP)
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशावेळी शरद पवार यांनी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) विद्यमान दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता जहरी टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, ” राज्यातील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या हिशोबाने आम्ही इंदापूरातून एका सहकाऱ्याला खूप संधी दिली. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष केले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. पुढे आमदार आणि मंत्रीही केले. पण इथे आल्यानंतर मला वेगळीच परिस्थिती असल्याचे कळाले.
अलिकडील काळात निर्माण झालेली ही परिस्थिती ऐकल्यानंतर माझ्यासारख्यालाही धक्का बसला. कारण इंदापूरचे राजकारण, शंकरराव भाऊंचे राजकारण स्वच्छ होते. त्यांनी कधीच कोणाच्या नव्या पैशाचा विचार केला नाही. पण अलिकडे इंदापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचे काम काहीजण करत आहेत.”
ते पुढे म्हणाले, ” मी इथे आल्यापासून पाहतोय की, लोकांच्या हातात काही फलक आहेत. आणि त्या फलकांवर मलिदा गँग असा काहीतरी उल्लेख आहे. मी ही मलिदा गँग (Malida Gang) बारामतीला पाहिली होती. पण इथेही तशी काही गँग असल्याचे मला काही अधिकाऱ्यांकडून कळाले. मी ५५ वर्षांपासून राजकारण करत आहे. त्यामुळे प्रशासनात काही अधिकारी ओळखीचे आहेत. ते या सर्व परिस्थितीवर न बोललेलेच बरं असल्याचे म्हणत आहेत”, असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa