Sharad Pawar On Devendra Fadnavis | 1993 च्या बॉम्बस्फोटाबाबत फडणवीसांनी केलेल्या आरोपावर शरद पवारांनी केला मोठा खुलासा !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Devendra Fadnavis | भाजप नेते (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीदिवशी 14 ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या 93 च्या बॉम्बस्फोटाच्या (1993 Mumbai Serial Blasts) आरोपाला शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Sharad Pawar On Devendra Fadnavis)

 

मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना 12 स्फोट झालेले असताना 13 ठिकाणी झाल्याचं मी सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते 100 टक्के खरं आहे. हे मी केलं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार जळगाव दौऱ्यावर असून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

असं का म्हणाले शरद पवार ?
12 ऐवजी 13 स्फोट का असं का सांगितलं यावर बोलताना, हा स्फोट कोणी केला याबाबत जे साहित्य वापरलं ते मी स्वत: जाऊन पाहिलं. बॉम्बस्फोटामध्ये वापरलेलं साहित्य हे हिंदुस्थानमधील नाहीतर कराचीतील होतं. शेजारच्या देशाचा हिंदु-मुस्लिमांमध्ये (Hindu-Muslim) वाद वाढवण्याचं काम आणि मुंबईत आग लागावी असा प्रयत्न होता. स्थानिक मुस्लिम त्यात नव्हते पण मी बारावं ठिकाण मोहम्मद रोड (Mohammed Road) सांगितल्यामुळे ज्यांची जातीय दंगली करण्याची इच्छा होती त्या दंगली झाल्या नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

फडणवीसांनी काय केला होता आरोप ?
दरम्यान, जेव्हा मुंबईत 12 स्फोट झाले, तेव्हा शरद पवारांनी मुस्लिम भागात झालेला 13 वा स्फोट शोधून काढला होता.
कायदा आणि सुव्यवस्थेऐवजी लांगुलचालन करण्याला त्यांचं प्राधान्य होतं, असं देवेंद्र फडणवीसांनी पवारांवर टीका करताना म्हटलं होतं.

 

Web Title :- Sharad Pawar On Devendra Fadnavis | sharad pawar targets devendra fadnavis on 1993 mumbai bomb blast allegations

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा