‘सरळ’ आहे तोवर आहे, कुणी ‘वाकडे’ पाऊल टाकले तर तो ‘पाय’ काढायला मागेपुढे बघणार नाही : शरद पवार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे समजत आहे. माझी त्यांना विनंती आहे इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही, जर असं कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर देऊ. आम्ही सरळला सरळ आहोत. पण कुणी वाकडे पाऊल टाकलं तर पाय काढायला पण मागेपुढे बघणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत बंडखोरांचे नाव घेता दिली. शरद पवारांचे हे आक्रमक रुप पहिल्यांदाच इंदापूरमध्ये अनुभवायला मिळाले.

राष्ट्रवादी पक्षातील काही बंडखोरांनी भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आहे. ते बंडखोर नेते भाजपला मतदान करण्यासाठी मतदारांना दमदाटी करत असल्याचे शरद पवार यांना समजले होते. त्यानंतर त्यांना पवारांनी एक प्रकारे सज्जड दमच दिला आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेच्या आघाडीचा तिकीटाचा घोळ राज्यभर गाजला. पवारांनी विश्वासघात केला असल्याचा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली आहे. पवार म्हणाले इंदापूर विधानसभेबाबत माझ्याशी चर्चा झाली होती. हर्षवर्धन पाटील यांना मी थांबायला सांगितले होते. यातून मार्ग काढण्यासाठी मी दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर बोललो देखील होतो. भरणेही थांबायला तयार होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना सात ते आठ वेळा फोन केला मेसेज केले. मात्र, तरी संपर्क झाला नाही. काही दिवसांनी ते वर्षा बंगल्यावर जाऊन भाजपमध्ये गेल्याचे कळले, असे पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या