Sharad Pawar On Junnar Vidhan Sabha | जुन्नरची जागा कोण लढवणार? शरद पवार म्हणाले…

पुणे : Sharad Pawar On Junnar Vidhan Sabha | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. इंडिया आघाडीची आगामी बैठक, पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार आणि जुन्नर विधासभेच्या जागेविषयी पवार यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी असली तरी जुन्नरची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार आहे, असे स्पष्ट केले. (Sharad Pawar On Junnar Vidhan Sabha)

शरद पवार यांनी म्हटले की, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, जुन्नरमध्ये माझा शब्द डावलला जात नाही. त्यामुळे अतुल बेनके यांना तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकत्र्यांनी योग्य तो सल्ला दिला आहे. (Sharad Pawar On Junnar Vidhan Sabha)

पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहोत. यामध्ये जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो.

पक्षाच्या चिन्हाबाबत शरद पवार म्हणाले, सुरूवातीला काही वर्षे काँग्रेसची प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी चिन्हे होती.
तरी बहुमताने निवडून आलो. त्यामुळे चिन्हाला तसे फारसे महत्त्व मी देत नाही.
राज्याला आणि देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत.

इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीबाबत पवार म्हणाले, इंडीया आघाडीची पहिली सभा मध्यप्रदेशात व्हावी
असा माझा प्रयत्न आहे. परंतु, आघाडीतील काहींची वेगळी भुमिका आहे. या संदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe | शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, इंद्रजीत सावंत हे…