Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra | ‘या’ 2 कारणांमुळे शिंदे सरकार केव्हाही पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा – शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले आहेत. आज नवीन सरकारने सभागृहात बहुमताचा ठराव सुद्धा जिंकला आहे. मात्र, या नवीन सरकारबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी हे सरकार कधीही पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा असे संकेत स्वपक्षाच्या आमदारांना (NCP MLAs) दिले आहेत.

 

शरद पवार यांनी वर्तवलेल्या भाकितानंतर अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठक घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकारवर वरील भाष्य केले.

 

शिंदे-फडणवीस सरकार का कोसळणार आणि मध्यावधी निवडणुका का घ्याव्या लागतील याची कारणे सुद्धा शरद पवार यांनी यावेळी सांगितली. शरद पवार यांनी शिंदे गटात नाराजी असल्याचे म्हटले. पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. (Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra)

पवार पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते.

 

पवार यांनी आणखी एक कारण सांगताना म्हटले की,
भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने नाराजी आहे.
भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही.
त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे.
ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते.
त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असे संकेत पवार यांनी दिले.

 

Web Title :- Sharad Pawar On Mid Term Elections In Maharashtra | unrest in shinde camp will come out bjp is not happy with cm post be prepared for mid term elections in maharashtra says ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा