Sharad Pawar On MLA Disqualification | शिंदे-नार्वेकर भेटीवर पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”संशयाला जागा आहे, देवेंद्र फडणवीसांना निकाल माहिती आसावा”

मुंबई : Sharad Pawar On MLA Disqualification | उद्या १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर शिंदे गट आणि महायुतीची पुढील वाटचाल ठरणार आहे. मात्र, निकालापूर्वी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि qशदे गटातील नेते ज्या प्रतिक्रिया देत आहेत, त्यावरून चर्चेला उधाण आले आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे खळबळ उडाली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या बाबत केस आहे आणि जे निर्णय घेणार आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाणे
यामुळे संशयाला जागा आहे. पदाचा मान राखण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष यांच्यावर आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कदाचीत उद्याच्या निकालाबाबत माहिती आसावी, असे खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी दोन्हीकडून बाजू मांडून झाल्या आहेत.
पण निर्णय अद्याप आलेला नाही. आम्ही निकालाची वाट बघत आहोत.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत पवार म्हणाले, जोपर्यंत
दिल्लीचे सरकार बसत नाहीत तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार. तसेच ईव्हीएमबाबत पवार म्हणाले,
ईव्हीएमबाबतचा प्रस्ताव आम्ही निवडणूक आयोगाला पाठवला आहे. पण निवडणूक आयोगाने वेळ देणे किंवा चर्चा करणे
या दोन्हीही गोष्टी मान्य केलेल्या नाहीत. जयराम रमेश यांनी १२ पाणी पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून तरुणाचा मृत्यू, पुणे-सोलापूर रोडवरील घटना

Pune Katraj News | पीएमटी महिला कंडक्टरची प्रवासी महिलेला मारहाण, कात्रज बसस्टॉप येथील घटना

Pune BJP On MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर म्हणजे हवा भरलेला फुगा, टेंपररी आमदार – भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे

Muralidhar Mohol-Sanskriti Pratishthan | संस्कृती प्रतिष्ठान, शि. प्र. मंडळीतर्फे डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे 18 ते 20 जानेवारीला आयोजन (Video)

लाइट कट करण्यासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कोंढवा परिसरातील घटना

Pune Chronic Garbage Spots | पुण्यात कचरा टाकण्यात येणारे आणि साठला जाणारे नऊशे ‘क्राॅनिक स्पाॅट’ ! 161 ‘स्पाॅट’ कचरा मुक्त करण्यास महापालिका प्रशासनाला यश