Sharad Pawar On PM Narendra Modi | मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, पवारांनी मांडलं बेरोजगारीचं भीषण वास्तव, ILO अहवालाचा उल्लेख

संभाजीनगर : Sharad Pawar On PM Narendra Modi | देशात बेकारांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) जगभरात सर्वेक्षण करून एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, भारतात जेव्हा १०० मुले कॉलेजमधून शिकून बाहेर पडतात, त्यापैकी ८७ मुले बेकार आहेत. म्हणजेच देशात ८७ टक्के बेकारी आहे. त्याच देशाचे पंतप्रधान या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत नसतील तर त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. मुळात हा प्रश्न देशातील तरुणांनी उपस्थित केला पाहिजे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जालन्याचे उमेदवार (Jalna Lok Sabha) कल्याण काळे (Kalyan Kale) आणि औरंगाबादचे उमेदवार (Aurangabad Lok Sabha) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मविआच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, राज्यावर भीषण दुष्काळाचे संकट आहे. जनावरांना चारा नाही. यातून हे सकार आपल्याला कसे बाहेर काढणार याबाबत कोणीही चकार शब्द काढलेला नाही.(Sharad Pawar On PM Narendra Modi)

मी देशाचा कृषीमंत्री असताना राज्यात दुष्काळ पडला होता. तेव्हा मी औरंगाबादला आलो होतो. तेव्हा आमच्या सरकारने मोसंबीच्या बागांना पाणी देण्यासाठी आर्थिक तरतूद केली आणि त्या बागा वाचवल्या. शेतकऱ्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी हातातली सत्ता वापरायची हे सूत्र राज्यकत्र्यांनी अवलंबले पाहिजे. परंतु, सध्याच्या राज्यकर्त्यांना त्या शेतकऱ्यांची कसलीच चिंता नाही, अशी टीका पवार यांनी मोदी सरकारवर केली.

पवार पुढे म्हणाले, ज्यांनी मोदी सरकारविरोधात आवाज उठवला, जे लोक त्यांच्याबरोबर गेले नाहीत त्यांना या लोकांनी तुरुंगात डांबले आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तिहार तुरुंगात टाकले आहे.
पश्चिम बंगालमधील मंत्री तुरुंगात आहेत. पंजाबमधील मंत्री तुरुंगात आहेत. लोकांचे अनेक प्रतिनिधी तुरुंगात आहेत.
ही हुकूमशाही चालू आहे.

पवार म्हणाले, राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून सहाय्य मिळत नाही. हे राज्यकर्ते देशाला हुकूमशाहीच्या मार्गावर
नेत आहेत. ती हुकूमशाही आपली लोकशाही उद्ध्वस्त करून तुमचा आणि माझा अधिकार हिरावतील.
आपल्याला लोकशाहीवरील, आपल्या राज्यघटनेवरील संकट दूर करायचं आहे. यासाठी त्यांना (भाजपा) उत्तर द्यावं लागेल.

त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करणे गरजेचे आहे.
या जालन्याच्या आणि औरंगाबादच्या मतदारसंघात तुम्हाला कल्याण काळे आणि चंद्रकांत खैरे यांना विजयी करावे लागेल,
असे पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार